विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/- शिंदेवाही तालुक्यातील खांडला या गावातील खरकाळा परिसरात गुरे गावातील जनावरे चारणाऱ्या करिता गेलेल्या अनिल पांडुरंग सोनूले (३६)या तरुणावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज दुपारी 3.30वाजताच्या दरम्यान पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा बिट मधील कक्ष क्रं 563 मध्ये घडली.दररोज दिसणाऱ्या वाघाचा पगमार्क वाघाचा धुमाकूळ असल्याने गावातील सर्व खंडाला वासीयांनी मिटिंग घेऊन दररोज गावातील तीन वेक्ती आळीपाळीने गावातील गुरे चारणा करिता जातील असे ठरविले होते त्या नुसार आज अनिल पांडुरंग सोनूले,गजनन कुंभरे, विलास कुंभरे,या तीन वेक्तीची पाळी असल्याने ते गुरे चरण्यासाठी गेले होते,गावापासून अंदाजे 3 किलो मीटर अंतरावर खरकाळा परिसरात आपली जनावरे घेऊन तीन ठिकाणी जनवरणा चारीत होते,त्या पैकी अनिल याला ऊन असल्यामुळें झाडाखाली बसला होता,त्याला वाघाने ओढीत नसताना सोबत असलेले गुराखी कुंभरे यांचे लक्ष जाताच आरडाओरड करण्यात आली,अखेर वाघाने त्याला सोडून जंगलाच्या दिशेने पळाला या घटनेची गावकऱ्यांनी माहिती होताच गावकरी घटनास्थळी जमा झाले.अनिल हा घरचा कमावता कर्ता पुरुष होता,त्याचा मृत्यूपचात,पत्नी,मुलगा मुलगी आहे,
महिला वनरक्षक यांनी नदी ओलांडून गाठले घटनास्थळ
सदर घटना ही पळसगांव वनपरिक्षेत्रील पिपर्डा या बिटातील असून घटनास्थळी जाण्यासाठी उमा नदी असल्याने उमा नदीला 3 फूट पाणी वाहत असताना घटनास्थळी पोहचणे हे आपले कार्य समजून पिपर्डा बिटच्या महिला वनरक्षक सीमा ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी किलनाके वनपाल,ठाकरे वनरक्षक मॅडम,दांडेकर वनरक्षक, जुमडे वनरक्षक,व वनमजुर उपस्थित होते.