पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी औसा येथील गावठाण तलावात अत्याधुनिक बोटीद्वारे शहरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी नौका विहार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शहरातील बच्चे कंपनी मनमुराद आनंद लुटत आहेत. नगराध्यक्ष अपसर शेख या प्रकल्पा बद्दल बोलत असताना म्हटले की , मी ज्या वेळी 2002 साली औसा पालिकेचा नगराध्यक्ष झालो त्या वेळेपासुन माझे स्वप्न होते की माझ्या शहरातील लहान मुले आणि महिला हे बोटिंग करण्यासाठी शहर सोडून बाहेर जात आहेत . हे मला काही बरे वाटले नाही . म्हणूनच मी माझ्या शहरातील जनतेसाठी हे काम केलल आहे, असे डॉ . अपसर शेख यांनी सांगितले . नगराध्यक्ष शेख यांनी मुले व महिला यांच्यासाठी नौका विहीर करण्याची संधि अगदी मोफत दिलेली आहे .











