अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव : दि. ७ सप्टेंबर मेडशी येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांचा दि. ८ बुधवार रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने औचित्य साधुन बळी राजा मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. या मध्ये रूग्णांना फळ वाटप, वृक्ष लागवड, आसे विविध प्रकारची कार्यक्रम आयोजित केले आहे.तर मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये शासनाच्या विविध प्रकारच्या योजने मधुन विकास कामे केले असुन या मध्ये रिधोरा गोकसांगवी दलित वस्ती योजनेतुन २८ लक्ष रू. रस्ता, रेगाव खेर्डी २० लक्ष रू. सिमेंट रोड, पिपंळदरा, उंबरवाडी येथील शाळा दुरूस्ती, भौरद येथील सिमेंट रोड, मुगंळा येथे सिमेंट रोड व दवाखाना दुरूस्ती, मेडशी येथील नाला सरळीकरण, भौरद येथील शाळा दुरूस्ती असे विविध कामे केली आहेत. तर मेडशी भौरद रस्ता, भौरद भेलदुर्ग रस्ता, मेडशी येथे पोस्टमार्टम, मेडशी येथील पशू वैद्यकीय दवाखाना दुरूस्ती, मेडशी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे डोमशेड, जनसुविधा तिर्थक्षेत्र, कोळदरा धरण दुरूस्ती, कोळदरा स्मशानभुमी, मेडशी येथे सिमेंट बांध, मुगंळा येथे सिमेंट बंधारा, भौरद येथील स्वामी विवेकानंद आश्रम, मेडशी येथील आरोग्य वर्धित, आदी कामासाठी कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून मंजुरात करून घेतली आहे.अशा कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्या सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दि. ८ सप्टेंबर रोजी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे.बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांचे अमिष्टचितंन करण्यात येऊन सत्कार करण्यात येणार आसल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे यांनी सांगितले. व या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.


