सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : बैलपोळा सनाचे औवचित साधून आधार शेतमजूर कुटुंबाला समाजक्रांती परिवार मेहकर च्या वतीने घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाची होणारी वाताहत मनाला सुन्न करणारी असते.टिनपत्राच्या खिंडाऱ्यातून येणारा ऊन वारा पाऊस त्यांना नित्याचाच असतो.येणारे सणवार लहानग्यांच्या मनाप्रमाणे साजरे तर करावेच लागतात.तेंव्हा कसरत होते त्या निराधार माय माऊलीची.जेंव्हा-केंव्हा अश्या गरजू कुटुंबाची भेट होते,तेंव्हा आपलं सोयी सुविधांचं पारड त्यांच्या तुलनेत खूप जड वाटायला लागतं.तेंव्हाच गरजवंतांच्या घराचा रस्ता दिसायला लागतो व मदतीची भावना उफाळून येते. असा हा आजचा गरिब कुटुंबाच्या भेटीचा प्रसंग भावनिक करणारा.चार वर्षांपूर्वी भानपुरे कुटुंबातील कर्तापुरुष स्व. मनोहर कुंडलीक भानापुरे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं.उत्पन्नाचे कसलंही साधन नसलेल्या श्रीमती संगीता मनोहर भानापूरे आपल्या लहान मुलांचा सांभाळ रोजमजुरी करून करताहेत.आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भगिनीला आधार देऊन पोळा सण साजरा करण्याचा प्रयत्न समाजक्रांती परिवाराने आज केला. समाजक्रांती परिवार मेहकरच्या वतीने गजानन पाटोळे यांच्या हस्ते श्रीमती संगीता मनोहर भानापुरे यांना ११०००/-रु चा आर्थिक आधार देण्यात आला. त्यांनंतर आत्महत्या शेतकरी स्व.अशोक सुरुषे यांच्या कुटुंबाची विचारपूस अरण्यात आली.यावेळी माझ्यासह,दामुअण्णा सुरुषे,समाजक्रांती परिवाराचे सदस्य तथा मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकर्यांमध्ये अग्रेसर असलेले डॉ.श्री राम कडुकार,भिकाजी भानापुरे सुलतानपूर हे उपस्थित होते.


