तांदळी बुजुर्ग ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले आयोजन
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर तालुक्यातील तांदळी बुजुर्ग निवासी कृष्णराव वसंतरावजी घाडगे यांचा उत्कृष्ट कार्य आणि सेवानिवृत्ती बद्दल तांदळी बुजुर्ग ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार रविवारी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तांदळी गावचे युवा सरपंच अनिल नाकट होते तर बाळापूर मतदार संघाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ फाटकर ,पत्रकार संघाचे पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, सोंमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण रावजी अंधारे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश लांडे तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये पांडुरंग ताले संचालक जागेश्वर कृषी सेवा केंद्र वाडेगाव ,सौ सरलाताई सुभाष भोरे पोलीस पाटील तांदळी, सौ दिपाली संतोष नाकट उपसरपंच तांदळी, किसनराव गोळे, रामचंद्र भोरे, पुंजाजी बरडे ,सुभाष भोरे, सदानंद नाकट, संजय बरडे, अरुण नाकट ,सुधाकर उगले, देविदास अंधारे ,गजानन खर्डे, पंकज गायकवाड, अविनाश देशमुख ,नरेंद्र डिवरे, दीपक ढोरे, गणेश शांताराम नाकट आदींचे मंचावर उपस्थिती होती.
सर्वप्रथम शिक्षक दिन असल्याने सर्वपल्ली राधाकृष्णन आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पूजन करून दीप प्रज्वलन केले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ हारार्पण करून गाव करी यांनी स्वागत केले. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या कृष्णराव घाडगे सरांचा सपत्नीक सत्कार तांदळी गावच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी केला तर पत्रकार संघटनेच्या वतीने देवानंद गहिले, अंकुर साहित्य संघाच्यावतीने सुरेशजी लांडे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नारायण रावजी अंधारे, यासोबत कृष्णराव घाडगे यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष भोरे सर यांनी करून श्री कृष्णरावजी घाडगे यांनी दिलेल्या सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली आणि कृष्णराव घाडगे यांच्या जीवन प्रवासावर दृष्टीक्षेप टाकला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना कृष्णराव घाडगे यांनी दिलेल्या आदर्श सेवेबद्दल त्यांनी गुणगौरव केला आणि आम्ही सदैव घाडगे सर यांच्या पाठीशी आहोत असे त्यांनी भावोदगार काढले. तर देवानंद गहिले, नारायण अंधारे, सुनील फाटकर, सतीश नाकट, सुरेश लांडे, देविदास अंधारे, गणेश नकट तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी कृष्णराव घाडगे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती देऊन त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या तर मी जे काही कार्य केले आहे ते उपस्थित मान्यवरांच्या माझ्याच नाही मित्रांच्या आदरणीय वरिष्ठ गुरुजनांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहन आतून केले आहेत म्हणून हा सत्कार मी त्यांना समर्पित करीत आहे असे भावपूर्ण मनोगत सत्कार मूर्ती कृष्णराव घाडगे गुरुजी यांनी व्यक्त करून मी कधीही सेवेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे गुरुजी यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरुण नाकट सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम कौलकार, दामोदर बरडे, गजानन किसन नाकट, मंगेश गोळे, श्रीकृष्ण भुंबरे, समाधान गावंडे, शिवलाल नाकट, सोपान मनतकार, विकी राऊत , गोपाल भोरे, अनुराग भोसले, शुभम घाडगे, देवेंद्र माहोकार , प्रमोद खेळकर, विठ्ठल भोरे , सुशील घाडगे, यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य तसेच गावकरी मंडळी आदींनी परिश्रम घेतले आहेत.