अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला – साथ सेवक फाउंडेशन कडून समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात. शिक्षक दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतिने रविवार ता.05 सप्टेंबर रोजी वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. साथ सेवक फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात तत्परतेने आपले कार्य पार पाडत असते. यावर्षीच्या शिक्षक दिन वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेऊन पार पाडण्याचा निश्चय साथ सेवकांकडून करण्यात आला होता.ज्यामध्ये शिक्षकांनी वृक्षारोपण करावे आणि विद्यार्थी त्या वृक्षाचे संगोपन करावे. शिक्षक नेहमी विद्यार्थी, समाज,राष्ट्रनिर्माण च्या प्रक्रियेचा मुख्य पाया आहे तर विद्यार्थी त्या पायावर इमारत निर्माण करावी ही प्रत्येक शिक्षकांची इच्छा असते. याच विचाराने निसर्ग सौंदर्याने विचार प्रगल्भ करण्याच्या आणि शिक्षकांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याची ही अनोखी पद्धत साथ सेवक फाउंडेशन च्या साथीदार विद्यार्थ्यांनी रविवार ता. 05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिलोंडा परिसरात वृक्षारापन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. तसेच लावण्यात आलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी यावेळी गावकऱ्यांसोबत साथ सेवक फाउंडेशनच्या साथीदारांनी घेतली. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार अक्षय राऊत यांनी यावेळी मानले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, एलआरटी कॉलेजचे प्राचार्य श्रीप्रभु चापके, प्राचार्य के.व्ही.मेहरे, प्रा.मेघराज गाडगे, प्रा.सचिन भुतेकर, शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे, रवि अरबट, पोलिस उपनिरिक्षक तुषार नेवारे, गोपाल मुकूंदे, रूपेश कामले, विष्णुदास मोंडोकार, विशाल शिंदे, उमेश शिरसाट, सुदन डोंगरे, श्वेता शिरसाट, शिलोडा देवस्थानचे प्रमोद सरोदे, शशिकांत मामनकर, शशिकांत सरोदे, बंडू पाथरकर, सुनिल सरोदे, राजु सरोदे तसेच साथ सेवक फाउंडेशनचे साथ सेवक अंकुश इंगळे, ओम सरोदे, पूर्वा, सृष्टी, प्रगती, गौरी, ऋषीकेश मुळे यांनी वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली.