सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर येथे महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.या पूर्वी तलाठी सातबारा मधील गाव नमुना बारा म्हणजे पिक नोंदवही ही 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत पाहणी करून खरीप पिकांची नोंद करीत होते परंतु या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने इ पीक पाहणी हा प्रकल्प कार्यान्वित केला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.या प्रकल्पामधून सर्व पीक नोंदी ह्या शेतकऱ्यांनी स्वतः घ्यायच्या असून शेतकऱ्यांना शेतात जाऊन अँड्रॉइड मोबाईल मधून इ पीक पाहणी नावाच्या एप्लीकेशन मधून पीक भरावे लागणार आहे. याकरिता अतिशय सुलभ अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली असून गुगल प्ले स्टोअरवर इ पीक पाहणी नावाने ही प्रणाली निःशुल्क उपलब्ध आहे .दरम्यान आज दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी खासदार प्रतापरावजी जाधव यांनी आपल्या मेहकर भाग एक येथील स्वतःच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी केली.दरम्यान हे ॲप्लिकेशन सोपे असून सर्व शेतकऱ्यांनी या माध्यमातून लवकरात लवकर ही पीक पाहणी करावी असे आवाहनही त्यांनी केले पिक पाहणी झाली नाही तर गाव नमुना बारा हा भरला जाणार नाही आणि त्यामुळे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात अशी शक्यता लक्षात घेता ही पीक पाहणी करण्याचे आवाहनही महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ई पीक पाहणी करतेवेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड तहसीलदार डॉ.संजय गरकल,अजय उमाळकर,बाळू जाधव,व इतर उपस्थित होते.


