अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव : तालुक्यातील डही येथे विश्वशांती बुद्ध विहार डही येथे सायंकाळी सात वाजता वामनदादा कर्डक यांची वर्ष शताब्दी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रमेश तायडे, तसेच डही येथील ग्रा. पं. सदस्य रमेश अवचार,जे.एस. शिंदे, विकास अवचार, बबन कांबळे, माजी सैनिक पी. जी. भारसाखळे, एडवोकेट विवेकानंद सहस्त्रबुद्धे, आदी उपस्थित होते. यावेळी “बाबाची वाणी वामनदादांची गाणी” हा बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पी. जी. भारसाकळे, प्रल्हाद गव्हांदे, गजानन गव्हांदे, भारत गव्हांदे, समाधान कांबळे, गौतम गव्हांदे, उद्धव गव्हांदे, प्रल्हाद कांबळे, लताबाई भारसाकळे, लिलाबाई गव्हांदे, लताबाई गव्हादे, इंदुबाई गव्हांदे, सुभाष गव्हांदे, या सर्वांनी वामनदादा चे गीते गाऊन कार्यक्रम साजरा केला. यावेळी गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दाजीबा अवचार, सुरेश गव्हांदे मिस्त्री, बहुसंख्य पुरुष महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास अवचार यांनी तर आभार गजानन गव्हादे यांनी मांडले.


