सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम:- पावसाळ्याच्या दिवसात कोरोनाबरोबरच साथ रोग उद्भवणार नाहीत या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींनी मान्सूनपूर्व कामे चोखपणे पार पाडावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच दिले आहेत या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने नालेसफाई नाली बांधकाम आदी कामे वेळेपूर्वी करून कुठे घाण पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी संपूर्ण गावात साचत असून नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे नाल्यातील सर्व पाणी रोडवर साचत आहे घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन साथरोग बळावत असल्याचे दिसून येते डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अनसिंग शहरात हिवताप डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल होत असल्याचे चित्र असतानाही शहरात धूर फवारणी नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक वार्डात धूर फवारणी करून नाल्यात पाणी साचणार नाही याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे