योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या मोटेगाव येथील गावालगत कक्ष क्रमांक 441 च्या झुडपी जंगलात उध्दव काशीनाथ सुकारे यांची बकरी बिबट्या ने दोन दिवसा पूर्वी ठार केली. परंतु आज त्या बकरीचा मृत्यू अवस्थेत दिसून आली आणि तिला बिबट्याने ठार केले होते. असे अवशेष वरून दिसले. मोटेगाव येथे आतापर्यंत अनेक पाळीव पशुवर वाघाचे आणि बिबट्याचे हल्ले झाले आहेत. गुरांच्या गोट्यात आणि गावात घुसून हिंस्त्र पशुनी हल्ला केला आहे. त्यामुळे या गावात वाघाची दहशत आहे. सुकारे यांची बकरी मागील 2 दिवसा पासून गायब होती. तिचा शोध घेतला परंतु ती मिळाली नाही. आज ति गुरख्याना मेलेल्या अवस्थेत तिचे अवशेष दिसले तेव्हा हि तीच बकरी असल्याचे खात्री करून वन विभागाला माहिती देण्यात आली. लगेच वनरक्षक नागरे यांनी घटनास्थळी येऊन बकरीचा पंचनामा केला. सदर घटनेत बकरी ठार झाली तेव्हा मालकाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी गावकरी करित आहेत.