स्वप्निल मगरे
शहर प्रतिनिधी, यवमाळ
उमरखेड शहरासह जिल्ह्यात बुधवारी सकाळी सात वाजून 14 मिनिटाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याच क्षणाला मराठवाड्यातील काही शहरांमध्ये देखील भूकंपाचा धक्का बसला. हिंगोली परभणी जिंतूर व नांदेड जिल्ह्यात बऱ्याच भागांमध्ये हे धक्के जाणवले. तर विदर्भातील पुसद उमरखेड व ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिस्टल शेल एवढी होती. तर नांदेड जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू होते असे समजले जाते. काही नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला तर काहींना धक्का ची जाणीव झाली नाही असे बोलले जात आहे. सहा महिने आधी देखील असे भूकंपाचे धक्के उमरखेड ला जाणवले होते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. खिल्लारी भूकंपाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना अशी चर्चा नागरिकात होताना दिसून येत आहे.