इम्रान सय्यद तालुका प्रतिनिधी उमरगा
मुरूम शहरातील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुविधा केंद्रात महिलांचा अर्ज भरण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे मागील चार दिवसात जवळपास 200 पेक्षा अधिक महिलांनी योजनेचे अर्ज भरले असून भरलेले अर्ज भाजप कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शहरातील पात्र महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या पुढाकाराने शहर भाजपच्या वतीने शहरातील भाजप कार्यालयात दि (४) रोजी योजनेचा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रात योजनेसाठी पात्र महिलांना लागणाऱ्या कागदपत्राची माहिती देणे, ऑफलाइन पद्धतीने अर्ज मोफत भरून घेण्यात येत आहे त्यामुळे भाजप कार्यालयात योजनेची माहिती घेण्यासह अर्ज भरण्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मागील चार दिवसात 200 पेक्षा अधिक महिलांचे या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याकडून अर्ज भरून घेण्यात आले आहे भरलेले अर्ज दिनांक (९) रोजी भाजप कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले यासाठी भाजपचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, सुरेश गायकवाड, सुनील नलावडे, आकाश क्षीरसागर, विशाल व्हनाळे, राजकुमार हिरेमठ, मनीष ब्याळे, रवी सराटे,महेश धूमरे यांच्यासह अदी पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेतचौकटमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी गैरसोय होऊ नये व या योजनेपासून शहर व परिसरातील पात्र महिला वंचित राहू नये यासाठी शहर भाजप कार्यालयात योजनेचा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे सुविधा केंद्रात प्राप्त झालेले अर्ज प्रशासनाकडे वर्ग करून अर्ज मंजुरी पर्यंत भाजपकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची अडचण येत असल्यास ते मिळवून देण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे भाजप कार्यकर्ते पाठपुरावा करत आहेत त्यामुळे या योजनेत पात्र असणाऱ्या सर्वच महिलांनी अर्ज करावे श्रीकांत मिनीयारजिल्हाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी धाराशिव