तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : माझी लाडकी बहिण ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. जिआर काढला सर्व अटी शर्ती कढून टाकण्यात आल्या हे जरी खरे असले तरी तसे पाहता काही बहिणी नाराज आहेत. एक अट अशी घातली आहे की एक रेशन कार्ड वर एक विवाहित व एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही अविवाहित महिलांचे असे म्हणणे आहे की जर आम्ही एकाच कुटुंबातील अविवाहित दोन महिला व एक विवाहित महिलेला तसेच दोन जावा एक सासू आहे तर फक्त दोघींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या लाडक्या बहिणीला या लाभापासून वंचित राहावे लागेल. पण एकही महिला या योजनेपासून वंचित राहूनये असे देखील मटले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून लाडक्या बहिणींचे असे ही म्हणणे आहे की जर २१ वर्षावरील अविवाहित ( मुलगी ) महिला ज्यांचे शिक्षण ग्रॅज्युएट ते पदविका प्राप्त केली आहे आम्ही आमच्या योग्यतेप्रमाणे आमच्या हाताला काम द्या ! लाडक्या बहिणी नाराज झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.