स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील ब्राह्मण समाज येथे भगवान परशुराम सेवा समितीच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ चा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून. यश संपादन केले. त्यांनी मिळविलेल्या यशाची समाजातर्फे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष अजय चंद्रकांत बेदरकर, व माजी अध्यक्ष मधुसूदन पांडे, व कार्यकर्ते संतोष देव, सुनील वानरे, विजय पाध्ये, एडवोकेट रविकांत पांडे एडवोकेट रविकिरण देव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस वितरण केले व कार्यक्रमासाठी मोलाची भूमिका बजावली समाजात असे कार्यक्रम राबविल्यास येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल व समाजाचे नावलौकिक होऊन देशामध्ये समाजाचे नावलौकिक होईल.