जलील शेख , तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाथरी शहरात शिवसेना भवन कार्यालय येथे आज प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी विविध विरोधी पक्षातील ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.यामध्ये विलास वाघ (व्हाईस चेअरमन,टाकळगव्हाण),सायाळा दामोदर खटिंग (ग्रा.प.सदस्य),उद्धव खटिंग (तंटा मुक्ती अध्यक्ष),रामदास शिंदे(शालेय शिक्षण समिति अध्यक्ष),मुंजाजी शिंदे( ग्रा.प.सदस्य),पप्पु इनामदार (ग्रा.प सदस्य),रावसाहेब हिके,विठ्ठल निळे (उपसरपंच लोहीग्राम),माणिकराव शिंदे (माजी ग्रा.प सदस्य लोहीग्राम),संतोष खराबे(सरपंच,पारडी ता. मानवत) इत्यादींचा समावेश आहे.यावेळी बोलताना पाथरी विधानसभेचे शिवसेनेचे संभावित उमेदवार सईद खान यांनी असे सांगितले की,गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेला घराघरात पोहोचवा.तेव्हाच आपण तालुक्यातील लोकांना न्याय देऊ शकू,अन्यथा परभणी जिल्ह्यातील प्रस्थापित नेते आणि पाथरी तालुक्यातील आजी-माजी आमदार तालुकाच्या विकास गतीला खिळ बसवतील.यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला पाथरी विधानसभेतून शिवसेनेचा आमदार निवडून द्यावा लागेल. ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी मला साथ दिली तर मी नेतृत्व करायला तयार आहे असेही शेवटी सईद खान म्हणाले.