शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी,श्रीगोंदा
थायलंड येथे होणाऱ्या 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान 20 वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी श्रीगोंद्याची वाघीण पै.धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड धनश्रीने दिल्ली नोएडा येथे24 तारखेला झालेल्या निवड चाचणीत आपली नेत्रदीप कामगिरी करत 55 किलो वजन गटात पहिल्या कुस्तीमध्ये इंटरनॅशनल पैलवान ज्योती हीस 5–1 पराभूत करून फायन ल ला प्रवेश केला व फायनल मध्ये दिल्लीची दीप्ती कुमारी6-2 हरून आपले भारतीय संघात स्थान पक्के केले धनश्रीला घडवण्यामागे तिचे आजोबा नामदेव फंड व आजी सरस्वती फंड आणि आई सौ पुजा ताई फंड यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे , तसेच तिची कोच वस्ताद हनुमंत फंड, व कोच सातव सर, धनश्रीला व आर्थिक मदत करणारे एक दानशूर व्यक्ती आमचे मार्गदर्शक श्री बाळासाहेब राउत पुणे यांचे मार्गदर्शन लाभले धनश्रीचे इंडिया टीम मध्ये निवड झाल्याबद्दल आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे धनश्रीला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामधून शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे त्याचबरोबर अरुण आनंदकर साहेब , तहसीलदार विजय बोरुडे ,डॉक्टर रोडे ,डॉक्टर ढवळे ,पै. वाल्मीक साबळे, पैलवान सोनवणे अप्पा ,पै. राहुल पाचपुते.सागर पवार.पै सागर जाधव.हरीभाऊ काळे,यांनी अभिनंदन केले