स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शैक्षणिक वर्ष २०२४.२५ कालावधीला नुकतीच सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने शासनाने यावर्षी शाळा वेळापत्रक केलेला बदल सकाळची शाळा ही ६.५०ला होती. आता ती ९वा. भरणार आहे. सकाळी लहान मुलांना अपुऱ्या झोपेमुळे असंख्य रोगांना पुढे जावे लागत होते. बऱ्याच वेळा लहान मुले चक्कर येऊन पडत होते. तर काहीजण वर्गात डुलकी मारताना पहावयास मिळायचे. शाळेच्या वेळापत्रकाची पूर्तता करताना. पालक वर्गाला देखील दम छाक होत होता. शासनाने घेतलेल्या वेळापत्रक बदलाचे पालक वर्गात सर्वत्र स्वागत केले जात असून. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. शासनाने घेतलेल्या वेळापत्रक बदलाचे खाजगी शाळा अंमलबजावणी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन त्यांना बंधनकारक करतील का शासकीय शाळेप्रमाणे खाजगी शाळांना देखील नेम लागू राहतील का अशी चर्चा पालक वर्गात जोर धरताना दिसून येत आहे.