देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन येथे छत्रपती “शाहू महाराज याच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त” गुरु रविदास सत्यशोधक समाज जिल्ह्याच्या वतीने भोकरदन येथे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीतील तसेच विविध अभ्यासक्रमातील प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकरदन तालुका संयोजक श्री एस के आकोदे यांनी केले तर मुख्य मार्गदर्शन प्रदेश सचिव श्री बी एल बडगे यांनी केले.छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर अँड श्री एफ एच सिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच याप्रसंगी सेवानिवृत्त झालेले श्री सांडू रामलाल आक्से यांना सेवानिवृत्ती मुळे निरोप देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस के अकोदे यांनी केले तर समारोपिय भाषण श्री बी एल बडगे यांनी केले.यावेळी धावडा येथील श्री शिवलाल वैरी,हसनाबाद येथून श्री रोहिदास मिमरोट,कठोरा बाजार येथील श्री बि एस बैनाडे,आलापूर येथील श्री डॉक्टर अक्षय प्रतिष्ठित व्यापारी श्री मधुकर ढोले,श्री भानुदास सपकाळ साहेब,श्री उखाजी जाधव व परिसरातील गुणवंत विद्यार्थी,पालक यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.