नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची संधी द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे नांदेड जिल्हा महासचिव शाम ढगे यांनी केली आहे.या वेळि तालुका अध्यक्ष संतोष सातव युवक अध्यक्ष कूष्णा कटारे उपस्थित होते राज्यात १२ जुलै रोजी विधानसभेतून विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे दोन जागा आहेत.यामध्ये कल्याणराव आखाडे यांना संधी द्यावी ही राज्यातील सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह, ओबीसींतील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे गेली पंचवीस वर्षे समाजकार्यात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाज जागृतीसाठी झोकुन देऊन काम करणारे निष्ठावान नेतृत्व असलेले . कल्याणराव आखाडे राज्यातील माळी समाजाचे समाजमान्य नेतृत्व आहे. सावता परिषद माळी समाजाचे सक्रीय संघटन असुन राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहे.माळी समाजाच्या हिता- अस्मितासाठी लढणारा हे लढवय्ये व्यक्तिमत्त्व आहे.श्रीक्षेञ अरण विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे त्यांचे योगदान आहे.राज्यातील मतदार संघात सावता परिषदेची निर्णायक व्होट बँक आहे.अनेक वर्षांपासून माळी समाजाला विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही.कल्याणराव आखाडे यांना संधी दिल्यास निश्चित आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होऊ शकतो.अनेक वर्षापासुन निष्ठेने, तळमळीने व प्रमाणिकपणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचलेले संघटक म्हणून सावता परिषदेचा उल्लेख आहे. कल्याणराव आखाडे राज्यातील तरूण ओबीसी चेहरा म्हणून वंचित, उपेक्षितांच्या न्यायासाठी झगडणारे आहेत.समाजाच्या न्यायिक भावनेचा विचार करावा. अजितदादा पवार यांनी विधानपरिषदेवर त्यांना संधी द्यावी अशी मागणी प्रसिद्धी पञकाद्वारे सावता परिषदेच्या पदाधिकारी यांनी केली आहे.