विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, आज छत्रपती संभाजी नगर राष्ट्रवादी भवन अजित दादा पवार गट येथे सिल्लोड सोयगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. श्री. ठगणराव देवराव भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुनील तेजराव पालोदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट सिल्लोड सोयगाव विधानसभा अध्यक्ष युवक पदी निवड करण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब, युवकचे जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी उपस्थित सिल्लोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील आमटे, सोयगाव तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, सिल्लोड शहराध्यक्ष दादाराव काळे, तालुका उपाध्यक्ष प्रविण पाटील काकडे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अक्षय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी चे शहराध्यक्ष नारायण भाऊ पुरी, नामदेव कोल्हे, यांच्यासह सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)