स्वप्निल मगरेशहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील संयुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आजकाल वाढदिवस म्हटले की पार्टी ही ठरलीच मग त्या पार्टीमध्ये नाही त्या गोष्टी आल्याच तरुण पिढी ही अशाच पार्टीच्या आहारी जाऊन आयुष्यातला समतोल हरवताना दिसतात. हा आनंदाचा दिवस बऱ्याच वेळा दुःखाच्या सावटात गेलेला. ऐकावयास मिळतो. या सर्व गोष्टींना आळा बसावा व तरुण मुलांमध्ये एक नवा संदेश पोहोचावा त्या दृष्टिकोनातून संयुक्त पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक शिवाजी माने काका यांनी ही नवी संकल्पना मांडली. व गरजू लोकांना त्यांच्या जागेवरच त्यांना एक दिवस पोटभर जेवण दिले गेले. पैशाचा अपव्यय न करता कोणत्याही ढमाचारा शिवाय व शासकीय रुग्णालयात फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.











