नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील ३३ वर्षीय युवकांस हातोडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या युवकांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना दि. १२ जुन रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर दि. १३ रोजी त्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी हा मयताचा मित्रच असल्याचे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले असून,मित्राने मित्राचा खून का? केला असल्याचे समोर आले आहे.पवना येथील आशिष साईनाथ जाधव ३३ वर्ष या युवकाचा सरसम ते करंजी महामार्ग रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील सिमेंट पुलाच्या संरक्षण भिंतीच्या मधोमध गंभीर जखमी अवस्थेत सदर युवक आढळून आल्यानंतर नंतर एकच खळबळ माजली. त्या जखमी युवकांस नांदेड येथे अधिक उपचारांसाठी नेण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताची आई सुंदरबाई साईनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान पोलीस तपासात चौकशी साठी मयताचा मित्र संशयित म्हणून पवना येथील प्रदिप विश्वनाथ तपासकर वय ३३ वर्ष यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. आता या मर्डर केस मधील आरोपी सिद्ध झाला असला तरी आणखीन या गुन्ह्यांमध्ये कुणाचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत असून आरोपी प्रदिप तपासकर यास न्यायालयासमोर उभे केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी सांगीतले आहे.











