रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
सातपुडा पर्वतराईच्या पायथ्याशी वसलेल्या हिवरखेड शहराला हिरवेगार करण्याच्या हेतूने येथील विविध साइटवर स्वस्तिक पॅटर्न द्वारे ऑक्सिजन मॅन ए. एस. नाथन वृक्षक्रांती करीत आहेत. आज वृक्ष लागवडी प्रसंगी ऑक्सीजन मॅन नातं यांची प्रेस क्लब हिवरखेड द्वारा खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तुळशिदास खिरोडकार, प्रेस क्लब अध्यक्ष रितेश टीलावत, कार्याध्यक्ष संतोषकुमार राऊत यांची उपस्थिती होती. प्रेस क्लब हिवरखेड कडून या पर्यावरण कार्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. ऑक्सीजन मॅन नाथन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हवा, ध्वनी, पाणी आणि माती प्रदूषणाचा सामना करण्या साठी झाडे देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतात, पर्यावरण शुद्ध करतात आणि वातावरणाची शुद्धता वाढवतात. शिवाय झाडांवर फळे, औषधी वनस्पती आणि इतर मौल्यवान संसाधने आहेत जी मानवी कल्याणा साठी योगदान देतात. वृक्षारोपण आणि जतन करून, आपण प्रभावी पणे प्रदूषण कमी करू शकतो आणि शाश्वत जीवन पद्धतीं ना प्रोत्साहन देऊ शकतो. शेवटी, शाश्वत आणि सुसंवादी अस्तित्वाच्या आपल्या शोधात झाडे अपरिहार्य सहयोगी आहेत. त्यांचे जतन करणे हे केवळ कर्तव्य नाही तर वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहे. सर्वांसाठी हिरवेगार, निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आपण झाडे लावण्यासाठी आणि जंगलांचे संरक्षण करण्या साठी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांनी पुढाकार घेत वृक्ष क्रांतीचे जनक नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरात विविध प्रजातीची शेकडो झाडे स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत रोपण करण्यात आली आहेत.


