मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
स्थानिक हिवरखेड येथील होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल शाळेमध्ये आज दिनांक 21/06/2024 जागतिक योगा दिवस त्या निमित्ताने या शाळेत दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी योगा दिवस साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी आनंदात आणि उत्साहात योग दिनात सहभाग घेतला याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि सेवकवृंद सहभागी होते. या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. कल्पना अस्वार यांनी अनेक योग प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच योग म्हणजे काय भविष्यातील योगाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन माहिती दिली.अगदी उत्साहात व आनंदात योग दिन शाळेत साजरा करण्यात आला.योग दिनाप्रसंगी कोल्हे मॅडम शेळके मॅडम अग्रवाल मॅडम सोनोने मॅडम रहाटे मॅडम गवई मॅडम ढे़गेकर ताई उपस्थित होते.











