अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी मध्ये ४० हजार लोकसंख्या असून लोकांना सुविधा पुरविण्यासाठी ढाणकी नगरपंचायत अपयश ठरली आहे. ढाणकी मध्ये रस्त्यावर डबके साचत असून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे तरी पण नगरपंचायत कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे तसेच शंकर कत्तुलवाड यांचे दुकान ते संजय लोढा यांचे घरापर्यंत रस्त्याने खुप चिखल होत असुन उर्दू शाळेतील विद्यार्थी ह्याच रस्त्याने जाणे येणे करतात. तसेच भाविक लोकांची दिंडी, देविचे मंदीर, हनुमान मंदीर, मस्जिद, दत्त मंदीर हयांच्या साठी जाणे येणे भाविकांची वर्दळ नेहमी असते, या रस्त्याच्या बाजुच्या दोन्ही गल्लीत दारूचे दुकान आहेत. त्यामुळे एकमेव हा रस्ता सर्वाच्या उपयुक्त व सुरक्षित आहे. पण या रस्त्यावर पाण्यामुळे चिखल साचल्याने दुर्घटना होत असून लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे व तसेच नगरपंचायत अंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या 15 लाभार्थ्यांच्या घरकूल हप्त्यांची रक्कम आज पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. संबंधीत लाभार्थ्यांनी घरकुल यादी मध्ये आपले नाव आल्यामुळे आपले घर बांधण्यासाठी जुने असलेले कच्चे घर पाडले आहे. व तसेच आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यांना राहण्यायोग्य जागा सुध्दा नाही आहे. व त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. घरकुल भेटते की नाही या संभ्रमात नागरिक असून त्यांचे निराकरण करून सदरील लाभार्थ्यांच्या घरकुल योजनेची रक्कम लवकरात लवकर त्याच्या खात्यात जमा करावी.या संबंधित मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय ढाणकी नागोराव पोपुलवाड यांनी निवेदन दिले आहे तरी नगरपंचायत कर्मचारी या कडे कान्हा डोळा करताना दिसत आहे.











