अतिश वटाणे तालुका प्रतिनीधी उमरखेड
महायुती सरकारच्या विकासात्मक अजेंडाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरात, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उमरखेड महागाव विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार नामदेव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर, विविध विकास कामांचे भूमिपूजन ढाणकी शहरात, दिनांक १२ मार्च २०२४ मंगळवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे दरम्यान यशस्वीरित्या पार पडले.सर्वप्रथम अभय कोठारी ते डॉ. विजय कवडे यांच्या दवाखान्यापर्यंत होणाऱ्या सिमेंट रोडचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. याप्रसंगी छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपा यवतमाळ- पुसद जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष युवा नेते नितीन भुतडा, ढाणकी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल व उमरखेड महागाव विधानसभेचे विद्यमान लोकप्रिय आमदार नामदेवराव ससाने यांनी उपस्थितांना उद्बोधन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढाणकी भाजपचे शहराध्यक्ष युवा तरुण महेश पिंपरवार यांनी केले. तर आभार युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी केले तर, नंतर अल्पपोहाराच्या छोटेखानी कार्यक्रमानंतर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात विविध विकास कामांचे उद्घाटन ढाणकी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, आमदार नामदेव ससाने, नितीन भुतडा, रोहित वर्मा, शहराध्यक्ष महेश पिंपरवार, दत्त दिगंबर वानखेडे , आनंदराव चंद्रे , कृष्णा मुखीरवाड, भाजपा सर्व नगरसेवक तथा ज्या त्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.आता जवळच लोकसभेच्या निवडणुका आल्या असून लोकसभेच्या निवडणुका नंतर आचारसंहिता संपल्यानंतर , बऱ्याच विविध विकासात्मक कार्यक्रमाचे भूमिपूजन होऊन लवकरच ते पूर्णत्वास जातील अशी ग्वाही आमदार नामदेव ससाने यांनी दिली.चौकटढाणकी शहर व संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात आमच्या सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून, ही सर्व विकास कामे लवकरच पूर्ण होतील. आणि बऱ्याच प्रमाणात हे पुढील काळात सुद्धा होतील अशी मी ग्वाही देतो. आमचं ध्येय एकच आहे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम व्हावा.महाविकास आघाडी सरकारच्या काळात अक्षरशः निधी कितीही मागितला असला तरी मिळत नव्हता. असल्या बिकट परिस्थितीनंतर जेव्हा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले तेव्हाच मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळू लागला. आणि त्याचेच फलित म्हणजे सद्यस्थितीत हे होणारे ढाणकी शहरातील विकासात्मक कामाचे भूमिपूजन समारंभ होय.