सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
ओतूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिला दिनाच्या औचित साधून केक व टेलरिंग, मसाले प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. टेलरिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांच्या हस्ते करण्यात आले. बारा मार्च रोजी या प्रशिक्षणाचा समारोह पार पडला. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे ही भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मोहित ढमाले तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबन तांबे सरपंच छाया तांबे उपसरपंच प्रशांत डुंबरे ग्रामपंचायत दिलीप डुंबरे वैशाली ताजवे वनिता बटवाल मनिषा वारे इत्यादी उपस्थित होते.हे प्रशिक्षण पर्याया प्रतिष्ठानचे श्री वामन बाजारे सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले.