सकल मराठा समाजाची मागणीउपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिले निवेदन
निशांत मनवर शहर प्रतिनिधी, उमरखेड
सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर आंदोलने करत असुन त्यांच्यावर सूटबुद्धीने नांदेड येथील सभे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे सदरील गुन्हा ताबडतोब रद्द करण्यात यावा तसेच मनोज जरांगे पाटील यांची एस.आय .टी . चौकशी करण्याची घोषणा अत्यंत चुकीची असून उलट शासनाने ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची अधिसूचना काढून समाजाची फसवणूक केली आहे संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू असताना चौकशी करून आंदोलन दडपण्याचा प्रकार निषेधार्थ आहे सगे सोयरे सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या शब्दाची तातडीने सरकारने पूर्तता करावी अशा विविध मागण्याची संदर्भात सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देऊन हे मागण्या मान्य न केल्यास त तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी सरोज देशमुख ,प्रमोद देशमुख, सुनील लोखंडे, सचिन घाडगे, जनार्दन सुरोशे ,संजय काळे, मंदा चंद्रवंशी, बालाबाई चंद्रवंशी, ज्योती कदम, चंद्रभागा कदम, वच्छला चंद्रवंशी, प्रियंका पवार, वंदना कदम ,रत्नमाला भालेराव, गयाबाई सुरोशे, सरस्वती चव्हाण, संगीता सुरोशे,अनिता कदम ,वंदना चंद्रवंशी, राधा कदम ,वनिता वटाणे ,सत्वशीला चंद्रावंशी ,स्वाती कदम, गंगा हापसे, उषाताई भगत ,कल्पना भालेराव इत्यादी हजर होते.