सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी, आळेफाटा
आळेफाटा (वडगाव आनंद ) येथे दि .११ रोजी जुन्नर तालुक्याचे कार्यकुशल आमदारअतुल बेनके यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ पार पडला .लेखाशीर्ष च्या अंतर्गत वडगाव आनंद येथील मोक्षधाम मंदिर ते उंबरपट्टा रस्ता १०लक्ष रुपये , गावठाण परिसर कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष रुपये ,वडगाव आनंद स्मशानभूमी सुशोभीकरण करणे १०लक्ष रुपये ,गावठाण ते स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १०लक्ष रुपये ,वडगाव आनंद परिसर सुधारणा करणे १० लक्ष रुपये ,ग्रेप्स गार्डन ते आनंदराव चौगुले घर रस्ता करणे १०लक्ष रुपये .तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ग्रामा ६१ते वडगाव आनंद ते पादिरवाडी कळमजाई रस्ता ग्रामा २७० सुधारणा करणे २०लक्ष रुपये ,वडगाव आनंद एन.एच २२२ते कोकाटेपट्टा रस्ता १०लक्ष रुपये ,वडगाव आनंद ते बोटवाट रस्ता १५लक्ष रुपये .जिल्हा वार्षिक सर्वसाधारण साकव अंतर्गत वडगाव आनंद चौरेमळा ते जयसिंग कु-हाडे घरामागील साकव बांधणे ३५लक्ष रुपये ,वडगाव आनंद आडवा बोटा मार्ग पिंपरी पेंढार नवलेवाडी रस्ता करणे ५०लक्ष रुपये ,वडगाव आनंद ते पादिरवाडी रस्ता करणे २०लक्ष रुपये ,आळेफाटा शिंदे हॉस्पिटल ते बेंदमळा रस्ता करणे १०लक्ष रुपये ,रामा २२२ते जुना बोटा नगारी ठाकरवाडी मार्ग सा .क्र १/५००ते ३/००ग्रामा रस्ता करणे ३०लक्ष रुपये .यावेळी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.


