37 वर्षानंतर भरला पुन्हा 10 वी चा वर्ग
संतोष भरणे ग्रामीण प्रतिनीधी इंदापूर
इंदापूर – वालचंद विद्यालय व ज्यु.कॉलेज कळंब ता.इंदापूर जि.पुणे येथील विद्यालयाच्या सन 1986-87 च्या इयत्ता दहावीच्या बॅच च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा विद्यालयांमध्ये रविवार दिनांक 18.02.2024 रोजी संपन्न.विद्यालयात प्रवेशाच्या वेळी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे हलगी वाजवत स्वागत करण्यात आले. सुरुवातीला सर्व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सर्व गुरुजनांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून ३७ वर्षांनी एकत्र येऊन.आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणारे शाळेचे माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानेआपल्या विद्यार्थी दशेतील आठवणीत हरवून गेले होते .सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.शालेय जीवनातील प्रत्येक गोष्टीची आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष श्री.रामभाऊ कदम प्राचार्य श्री.सर्व गोड सर आणि पर्यवेक्षक श्री.देवकर सर,श्री.सुरेश सोपानराव अर्जुन सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.रणमोडे बाबासो,वागेश्वरी विद्यालय निर्हावागज बारामती येथे कार्यरत असलेले श्री रामचंद्र सोपानराव अर्जुन सर.कांबळे दिलीप,श्री.प्रमोद ढाळे आणि श्री सांगळे एकनाथ यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्नेहमेळाव्याचे प्रस्ताविक श्री.रणमोडे बाबासो यांनी केले.सूत्रसंचालन श्री नरळे यांनी केले.