बिहारीलाल राजपुत तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन येथे दि.22.02.2024 रोज गुरुवारी भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी झाली.जयंती निमित्त सर्व धर्मिय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सांप्रदायीक भजन पथक व विवीध जाती धर्मांच्या नागरीकांनी एकत्र येवून बस स्थानका जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ, भगवान विश्वकर्मा च्या नामाचा जयघोष केला.महाराज छत्रपतींना पुष्पहार अर्पन करुन सामुहीक अभिवादन करण्यात आले.नगर प्रदिक्षणा करीत भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा रथाची भोकरदन शहरातून मिरवणुक काढण्यात आली होती.सदर मिरवणूकीत तालुक्यातील बहुसंख्य महीला व पुरुष हजर होते.


