शेषराव दाभाडे तालुका प्रतिनिधी, नांदुरा
नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबा येथे इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा दिनांक २१-२-२०२४ रोजी आनंद मेळावा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोरभाऊ वाकोडे हे होते, तसेच शेषराव दाभाडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष भारतीय ब्लॅक पॅंथर, प्रवीणभाऊ भिडे सभापती बांधकाम , नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये शैक्षणिक साहित्याचा स्टॉल सौंदर्यप्रसाधनांचा स्टॉल, भाजीपाला विक्रीचा स्टॉल, इडली, समोसा, डोसे, पाणीपुरी, कचोरी, पोंगे, हरभऱ्याची उसळ, तुरीची उसळ, भेळ, वडापाव, पाव वडे, विविध प्रकारचे तळलेले याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सुमारे ३० स्टॉल लावलेले होते.या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख झाली. पैशांची देवाणघेवाण यांची ओळख झाली. त्याचप्रमाणे पैशांचे व्यवहार करताना बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट झाल्या. या आनंद मेळाव्यासाठी कृषी विद्यालय हायस्कूल मधील विद्यार्थी, उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण वा.भिडे, निलेश दाभाडे, लक्ष्मण जुमडे ,राजूभाऊ इंगळे तसेच माता पालक, गावकरी आणि शाळेचे मुख्याध्यापक इंदलसिंग बालोद सर , श्रीमती सुमन आढाव मॅडम, रमेश पाटील सर, विनोद कुलकर्णी सर, कविता शिंदे मॅडम , आणि सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विकत घेऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आनंद मेळाव्याला भेट दिलेल्या पालकांनी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप कौतुक केले आणि शाळेतील या आनंददायी वातावरण निर्मितीसाठी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले.