गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:- समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलकर यांचे नातू अतुल चिंचोलकर यांचे नांदुरा येथील छत्रपती निवास येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अभिनव शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवव्याख्यान,शंखनाद,जिजाऊ वंदना व शिवरायांच्या विचारांचे मंथन अश्या आगळ्या वेगळ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते.शिवविचारांचा जागर करणाऱ्या चिंचोलकर परिवाराप्रमाने सर्वांनी शिवजन्मोत्सव साजरा करावा आणि शिवजन्मोत्सवानिमित्त शिवविचारांचा जागर घराघरात व्हायला हवा असे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यावेळी शिवविचार मांडताना म्हणाले .या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी आचार्यजी हरिभाऊ जी वेरुळकर,आमदार राजेशजी एकडे,श्रीकृष्ण शेठ चिंचोळकर,इंजिनीयर सचिनजी तायडे,ह भ प चोबे महाराज,अजय घानोकार,लालाजी इंगळे,जगदीश आगरकर,अरुण नारखेडे काका,प्रा वा वि भगत,केदार भाऊ ढोरे ,डॉ शरद पाटील, शिंबरे सर,अमर पाटील, शैलेश भाऊ चिंचोळकर, कोळसकर गुरुजी,पत्रकार लक्ष्मण वक्टे, विजय डवंगे, दीपक फाळके, या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती,कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ वंदना, छत्रपतींना अभिषेक झाल्यानंतर अतुल भाऊ यांनी शंखनाद करीत गगनभेदी आवाजाने शिवगर्जना केली.त्यानंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण शिवभक्त मंत्रमुक्त झाले त्यानंतर अतुल भाऊ यांनी दैवत छत्रपती अशा सुंदर गाण्याने सर्व श्रोतागणांची मन जिंकून घेतली त्यानंतर सर्वांनी शिव भोजनाचा आस्वाद घेतला.