बापू मुळीक: तालुका प्रतिनिधी पुरंदर
सासवड (ता. पुरंदर )येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा लोकसभा धरतीवर भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कार्यकर्त्यांना पदग्रहण सोहळा चांगला पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, तीन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली .पहिल्यांदा कांता नलावडे यांच्याबरोबर तीन लाख मतांनी, तर दुसऱ्या वेळेस महादेव जानकर यांच्या समवेत 80 हजार मतांनी ,तर तिसऱ्या वेळेस कांचन कुल यांच्याबरोबर एक लाख 7 हजार मतांनी भरभरून जनतेने साथ मला दिली. परंतु कधीही वैयक्तिक टीका झाली नाही. पक्षनिष्ठ राहिले तर आता लढाई कुणाशीही नाही तर वैयक्तिक मताशी विचाराशी आहे. ईडी पायी पक्षांतर केले. घोटाळा केला म्हणून एक तर जेलमध्ये नाही ,तर सत्तेत राज्यसभा विधानसभा, विधान परिषद अशी भाजप कडून भीती दाखवत प्रवेश चालू आहे. खोटं बोलायचं तर रेटून बोलायचे.23 वर्ष पाणी चोरले, मग नाव घ्या पाण्यात खडा टाकायचा आणि पळून जायचे अशी मजा ही भाजप पहात आहे .विधवांची घरे घेतली ,घोटाळा आदर्श केला म्हणून भाजपने ईडी चा धाक दाखवून अशोक चव्हाण यांना जेल एका बाजूला दाखवले, तर दुसरीकडे राज्यसभा दाखवून प्रवेश करून घेतला .मेट्रोला विरोध नाही तर अंगणवाडी सेविकेला मानधन वाढवण्यासाठी विरोध का? शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भाव नाही, तर यांचा पाकिस्तान मध्ये चांगलाच बाजारभाव शेतकऱ्याला मिळत आहे. मग भारतात शेतकऱ्याला बाजार भाव का मिळत नाही. याबाबत केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा या ठिकाणी असा भेदभाव केला जात आहे .हे सरकार शेतकऱ् मेट्रोला विरोध नाही तर अंगणवाडी सेविकेला मानधन वाढवण्यासाठी विरोध का? शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भाव नाही, तर यांचा पाकिस्तान मध्ये चांगलाच बाजारभाव शेतकऱ्याला मिळत आहे. मग भारतात शेतकऱ्याला बाजार भाव का मिळत नाही. याबाबत केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा या ठिकाणी असा भेदभाव केला जात आहे .हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर मोठमोठे उदयोगपती घोटाले करतात त्यांना त्या उद्योगपतींना केंद्र सरकार व राज्य सरकार अभय देत आहे .म्हणून शेतकऱ्यांच्या बाबत शेतकऱ्यांच्या बाबत शासन निर्णय घेत नाही .असे सुप्रिया सुळे बोलताना आपले मत व्यक्त केले .पुरंदर तालुक्यात 40 महिलांना व 60 पुरुषांना पदे वाटप करण्यात आली. भारती शेवाळे, स्वप्नील गायकवाड, दत्ता चव्हाण, सुदाम इंगळे, विजय कोलते ,बबुसो माहुरकर ,सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सनदीअधिकारी संभाजी झेंडे, विजय कोलते ,सुदाम इंगळे, बाळासाहेब भिंताडे, पुष्कराज जाधव ,बबुसो माहुरकर ,दत्ता चव्हाण, शाम कात भिंताडे भारती शेवाळे, गौरी कुंजीर ,छाया यादव, पूजा भिंताडे, निता सुभागडे ,जयदीप बारभाई, भैय्या खैरे ,योगेश फडतरे, बबन टकले, नारायण निगडे ,अण्णा खाडे, बंडू जगताप ,स्वप्नील गायकवाड, वामन कामठे, गणेश होले, सुशांत कांबळे ,सरपंच ,उपसरपंच ,आजी- माजी पुरंदर तालुक्यातील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला, पुरुष ,युवक ,युवती बहुसंख्येने हजर होते .प्रास्ताविक माणिक झेंडे यांनी केले .सूत्रसंचालन हरिदास खेसे यांनी केले .तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जितेंद्र देवकर यांनी मानले.