रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
18 फेब्रुवारी रविवार रोजी आलेवाडी ईज्तेमा येथे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांन करिता अल्पो हाराची व्यवस्था करून सेवा देण्यात आली.सातत्याने १५ वर्षापासून या इज्तेमाकरिता हिवरखेड चे नागरिक दरवर्षी तीन दिवसीय इज्तेमा साठी जाणाऱ्या नागरिकांना हिवरखेड वआकोला, बेलखेड तेल्हारा,तळेगाव गोर्धा , आकोट,दर्यापूर ,अमरावती,अचलपुर ,परतवाडा ,अंजनगाव या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकरिता अल्पोप आहाराची व्यवस्था हिवरखेड, सोनाळा टी पॉईंटवर करण्यात अली होती.हा इजतेमा दरवर्षी प्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्या च्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवडी येथे साजरा करण्यात येणार आहे.या तीन दिवसीय इस्तेमा मध्ये शेवटच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता दुवा असते यामध्ये दूर दुरून मुस्लिम बांधव येऊन अल्लाह कडे साकडे घालून दुवा करतात या इजतेमा मध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या मुस्लिम बांधवांची हिवरखेड, सोनाळा येथे व्यवस्था करण्यात आली यामध्ये वार्ड क्र २ इंदिरा नगरातीलमुस्लिम बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.या सेवे करिता हिवरखेड सोनाळा टी पॉईंट वर असलेली होटेल ओम शक्तीचे संचालक वासुदेवराव निंबोकार यांच्या कडून पिण्याच्या पान्याची व्यवस्था लाईन,जागेची विशेष व्यवस्था पुरवली जाते हे मात्र विषेश आहे