संजय भोसले तालुका प्रतिनिधी ,कणकवली
सकारात्मक सोच आणि सकारात्मक विचार हे कलेच्या माध्यमातून मिळत असतात.करीयर घडवायाचे असल्यास सुखाची झोप मोडून काढली पाहीजे. शिखर खुप असतात तरी शिखरावर जायला एकालाच जागा असली तरी अनेक प्रकारची शिखर असतात.त्यामुळे आपल्याला कुठच्या शिखरावर जायचय याचे ध्येय्य निश्चित करा.भूतकाळात आजच्या काॅलेज जीवनातील गोष्टी तुम्ही पहाल त्यात तुम्हाला अंतरंग दिसेल.हाच अंतरंग तुम्हाला नवीन प्रेरणा देईल.जीवनात पुढे जायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन खुप गरजेचा आहे. असे प्रतिपादन अभिनेते तथा निवेदक निलेश पवार यांनी दिले.ते तोंडवली येथे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक विभागांच्या स्नेहसंमेलन अंतरंग २०२४ निमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी निलेश पवार याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व श्री सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सचिव निखिल सावंत,फार्मसी प्राचार्य तुकाराम केदार, रोहिणी विचारे, नर्सिंग प्राचार्य शकुंतला मॅडम, बी.एड.प्राचार्य लिना औंधकर, कृषी महाविद्यालय मनिषा अपराज, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, भिमराव चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले,जीवनात कला अंगी असली की सकारात्मक उर्जा मिळते.आज जीवनात मी आजही स्वतःला विद्यार्थी मानतो. काॅलेजचे सोनेरी दिवस पुन्हा येत नाही .येणारी नविन पीढी दिशा देणारी आहे. डिजिटल मिडियाचा वापर स्वतःच्या विकासाठी करा.कोणती गोष्ट सकारात्मक किंवा नकारात्मक घ्यायची हे आपण ठरवायचे.यासाठी ती गोष्ट आपल्या आतुन आली पाहिजे. स्वतःचे अस्तित्व सिद्ध झाल्यावर आत्मविश्वास आपोआप येतो असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करित अंतरंग २०२४ चे अनावरण करून सर्व शैक्षणिक विभागांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा भोई व आभार शितल कुंभार यानी मानले.


