दैनिक अधिकारनामा
पातुर : 21 फेब्रुवारी 2024 रोजी पातुर येथील शहाबाबू उर्दू हायस्कूल येथील केंद्रावर बारावीचे परीक्षा आजपासून चालू झाले असून आज चक्क पेपर सुरु असतांना पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने कॉफी पुरविताना तोतया पोलिसास ठाणेदार यांनी गजाआड केले घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की 21 फेब्रुवारी रोजी हायस्कूल वर बारावीचे परीक्षा सत्र चालू असताना पातूर पोलीस निरीक्षक हे आपल्या ताफ्यासह सदर परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी गेले असता तेथे अनुपम मदन खंडारे व 24 वर्ष राहणार पांगराबंदी हा पोलीस चा गणवेश परिधान करून इंग्रजी या विषयाची पाकीट मधून कॉफी पुरवताना ठाणेदार किशोर शेळके यांनी त्यास अटक केले.अधिक चौकशी केली असता सदर युवक हा तोतया पोलीस असल्याचे आढळून आले यावरून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अनुपम खंडारे याच्याविरुद्ध फिर्यादी वसंता गोबरु राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पातुर पोलिसात भादवी चे कलम 417, 419, 171, सह कलम महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 कलम 7 प्रमाणे गन्हा दाखल करून आरोपीस गजाआड केले व पुढील तपास पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.


