व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी पत्रकारिता व पत्रकार यांच्यावरील समाजाची विश्वासाहर्ता कमी होण्याचे ओघात मात्र तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटना अहेरीने भगवंतराव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा काटेपल्ली व जिप शाळा देवलमारीमध्ये शैक्षणिक साहित्यात नोटबुक, पेन व कंपास वाटून पत्रकारच समाजाचा आरसा असल्याचे सामाजिक कार्यातून दाखविले. त्यामुळे 400 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्यामुळे हास्य फुलले.सदर कार्यक्रमाला देवलमारीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, सामाजिक कार्यकर्ते संपत आईलवार, ग्रामविकास अधिकारी यशवंत लाडे,माध्यमिक मुख्याध्यापक शेंडे व प्राथमिक मुख्याध्यापक संपत व शंकर चालूरकर उपस्थित होते.तालुका पत्रकार संघटनेने तालुक्यातील पेरमिली व देवलमारी केंद्रातील 19 जिल्हा परिषद शाळांमधील 912 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक, कंपास व पेनचे वाटप केले होते. त्यानंतर तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा बारा केंद्रावर घेतली होती.अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्या तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. त्याच सामाजिक कार्याची कडी म्हणून भगवंतराव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा काटेपल्ली येथील वर्ग १ ते १० च्या सर्व 320 गरीब विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास व पेनचे वाटप केल्याने मुलांच्या चेहऱ्यावर तालुका पत्रकार संघटनेने हास्य फुलविले. तसेच यापूर्वी नोटबुक दिलेल्या जिल्हा परिषद शाळा देवलमारीतील 80 मुलांना कंपास व पेनचे वाटप मुख्याध्यापक गद्देवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमा वेळी मंचावर संघटनेचे सदाशिव माकडे, उमेश पेंढ्याला, सचिव रमेश बामनकर, श्रीनिवास बंडमवार, व्यंकटेश चालूरकर, राहुल दुर्गे, मधुकर सरमेक व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष असिफ पठाण, मुकुदा दुरगे , डॉ शंकर दुर्गे, प्रशांत ठेपाले, ओम चूनारकर, शहाजी रत्नम ,अनिल गुरनुले, मुन्ना कांबळे, श्रीधर दुग्गीरालापाटी, दीपक चूनारकर , संजय गजलवार, साहिल वाळके, बोम्मावार, गांगरेडीवार व इतर पत्रकारांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे, संचालन सचिव रमेश बामणकर व आभार व्यंकटेश चालूरकर यांनी मांडले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी पत्रकार संघटनेचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविलेल्याने पुढील सामजिक कार्याच्या शुभेच्छा दिल्या.