राजपाल बनसोड ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दिग्रस आर्णी मार्गावरील तूपटाकळी जवळ मुख्य रस्त्यावर दुचाकी ला चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रात्री रविवार दिनांक 18 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी घडली. सविस्तर वृत्त असे की , राहुल सुभाष जाधव (वय 36 )राहणार नांदगाव हा दिग्रस वरून आर्णी मार्गे पल्सर दुचाकी क्रमांक एम एच, 29 बीजी 5856 ने केळझरा येथे असलेल्या आपल्या सासुरवाडीला जात होता .दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी जवळ दिग्रस वरून आर्णी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी विस्टा क्रमांक, एम एच 29 ए डी 44 16 याने मागून जबर धडक दिल्याने तो गंभीर अवस्थेत होता.त्याला शासकीय रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .मृतकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला .मृतकाच्या पश्चात आई-वडील ,पत्नी, एक मुलगी ,दोन भाऊ असा परिवार आहे.या प्रकरणी फिर्यादी मृतकाचा वडील सुभाष सवाईराम जाधव याने पोलिसा सदर चार चाकी वाहनाने अपघात घडून माझ्या मुलास जीवाने मारल्याची तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी सदर वाहनावर भांदवी कलम 279 ,304 अनुसार गुन्ह्याची नोंद केली .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उमरकर यांच्या मार्गदर्शनात शालीक राठोड व दिलीप बोडखे करीत आहे.