प्रमोद शिंदे तालुका प्रतिनिधी माळशिरस
स्व.समाज रत्न मानसिंगराव शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, समता माध्यमिक व श्री भिवाई देवी ज्युनिअर कॉलेज पिरळे या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व समाज रत्न स्व मानसिंगराव (आबासाहेब)शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सोलापूर जि प चे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करून करण्यात आली.अथिती म्हणून डॉ. घनश्याम भोसले प्रदेशाध्यक्ष दलित पॅंथर, राजाभाऊ पाटील ओबिसी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, हे होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले..मदनसिंह मोहिते पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले. पालकांना व उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी पिरळे येथील अजी माजी सरपंच, उपसरपंच , पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, व पंचक्रोशीतील दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.कामाच्या आयोजन प्राचार्य दीपक शिंदे ,संचालक दादासाहेब शिंदे यांनी केले.