शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर आर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे आज संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते प्रेसिडेन्शियल टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रेसिडेन्शियल टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थी पहिल्या वर्गातून माधवी साळुंखे,सानवी ईक्कर, दुसऱ्या वर्गातून प्रांजल सानप, स्वरूप हाडुळे, तिसऱ्या वर्गातून समर्थ सुरवसे समृद्धी सुरवसे चौथी वर्गातून प्रज्वल रोडगे श्रेयश पोद्दार, प्रेरणा काष्टे, उन्नती राठी, पाचवी वर्गातून वीरेन सोनी साची सोमानी, गौरी अबुज, ओम साई कदम सहावी वर्गातून तत्वमसी शिंदे, तेजश्री चौधरी, अभिराज मोगल शौर्य काकडे, सानवी मरेवार,वरद कुटे,अजित झाडे, हर्षल जाधव,आठवी वर्गातून ओंकार खुडे,अनिकेत आंबेकर, तनिष्का तेलभरे, क्षितिजा खजिने, नववी वर्गातून श्रुती हाडुळे, अथर्व नंद, ख़ुशी मानधणे, आदित्य लाटे या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत प्रथम विद्यार्थी ऑरेंज कॅप व द्वितीय विद्यार्थी येल्लो कॅप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्याचं काम होत आहे असे पालक प्रतिनिधी डॉ. काकडे यांनी भावना व्यक्त केली.प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये अभ्यासा सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी व व्यक्तिमत्व विकास या गोष्टींवर भर दिला जातो खरंच शाळेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे कीर्ती खजिने मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले.डॉ संजय रोडगे सर म्हणाले की आज या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत , खेळ, सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण, इंग्लिश कंमुनिकेशन,पैंटिंग, संगीत या कलागुणांना सुध्दा जागृत ठेवले पाहिजे.प्रत्येक ऍक्टव्हिटी मध्ये भाग घेऊन स्वतःचे अस्तित्व सिध्द केले पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आणि आम्ही हे तुम्हाला आपल्या शाळेत देण्याचा,शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा घडत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे आज आपण केलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,आपल्या शाळेतील विद्यार्थी देशपातळीवर यश मिळवत आहे याचे खूप समाधान आहे. ही परंपरा कायम आपण भविष्यात ही ठेवाल ही अपेक्षा व्यक्त करतो.व्यासपीठावर सोबत शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला , प्रगती क्षीरसागर , पर्यवेक्षक अर्जुन गरूड, नारायण चौरे व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ममिता सिंग, कल्पना भाबट ,आभार प्रदर्शन प्रगती क्षीरसागर मॅडम यांनी मानले.यासोबत सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.