इम्रान सय्यद तालुका प्रतिनिधी उमरगा
मुरूम शहरातील पारंपारिक शिवजयंती उत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून किसान चौक येथे राबवली जाते.यावर्षी देखील किसान चौक येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले (दि१९) फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने मुरूम शहरातील प्रमुख मार्गासह मिरवणूक मार्गावरून शिवाजी महाराजांच्या जयघोष करत बाईक रॅली सह चार चाकी वाहने देखील काढण्यात आले व त्यानंतर किसान चौक येथे रॅली आली असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनआरुढ असलेल्या मुर्तीस उमरगा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंती प्रतिष्ठापना सोहळ्यास आलेल्या मान्यवरांच्या वतीने उपस्थित त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आले व त्यानंतर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद यावेळी दिसून आला.याप्रसंगी अशोक जाधव, प्रा. रवींद्र गायकवाड, प्रा. दत्ता इंगळे, सुरेश मंगरुळे,राहुल वाघ,राजेंद्र शिंदे,भगत माळी,विठ्ठल पाटील, रवी अंबूसे,नाना भालकाटे,मोहन जाधव, भीमराव फुगटे,संजय सावंत,प्रकाश इंगोले,मा.सैनिक व्यंकट चौधरी,महादेव शिंदे,सुदर्शन आवताडे,श्री इंगळे,महेश पाटील,स्वप्नील जाधव,संदीप बाबळसुरे, महेश जाधव,ओंकार फुगटे,वैभव इंगळे,प्रतीक राठोड,या प्रमुख मान्यवरांसह अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवजन्मोत्सव सोहळा समिती किसान चौकच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले


