बापू मुळीक तालुका प्रतिनिधी, पुरंदर
पुरंदर : पंचायत समिती पुरंदर तालुका गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2023-24 मधील आदर्श शिक्षिका म्हणून जि. प.प्राथ शाळा गायरान वस्ती च्या मुख्याध्यापिका श्रीम.स्नेहल सुभाष गद्रे मॅडम यांना प्राप्त झाला. आपल्या शाळेत शिकवणारे शिक्षक यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे व वैशाली खेंगरे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला.ग्रामस्थ व पालक तरूण वर्ग यांच्या वतीने सन्मान शनिवार दि. 17/2/2024या दिवशी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालकांनी व ग्रामस्थ यांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी मा.पी एस. मेमाणे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले तसेच ग्राम पंचायत पारगाव चे उपसरपंच मा.श्री चेतन मेमाणे व ग्राम पंचायत सदस्या अर्चना मेमाणे यांनी ही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मा.पी. एस् मेमाणे सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. महीला वर्ग कडून अतिथी व शिक्षक व इतर मान्यवरांचे औक्षण करण्यात आले मुलांनी छान ढोल व लेझीम तसेच स्वागत गीत म्हणून सर्वांचे स्वागत केले .सर्व ग्रामस्थ व पालक वर्ग तरूण वर्ग तसेच मुलांनी शाळेविषयी व मॅडम विषयी भरभरून कौतुक आपल्या मनोगतातून मांडले महीला पालक वर्ग यांनी हा कार्यक्रमनियोजन बद्ध व व्यवस्थित पार पडावा यासाठी खूप मेहनत घेतली.त्यामुळे महीलांचे विशेष कौतुक करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम छान पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना मेमाणे व आभार आशा मेमाणे यांनी केले. अध्यक्ष यांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.