सोहेल खान शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
केळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सन २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे दि.१५ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले केळापूर तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ देण्यात आला तर काही भागातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला नाही आल्यामुळेच,अध्याप पर्यंत सर्व शेतकऱ्यांना लाभ का मिळाला नाही याची चौकशी करून सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ देण्यात यावा,शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस,सोयाबीन,तूर पिके लावून जोपासना केली लावून पिके हातात येई प्रयत्न काळजी घेतात निसर्गच्या लहरी पणामुळे व पावसाने दढी मारल्यामुळे पिके वाढ होत नाही तसेच पिके सुखून जातात त्यामुळे शेतकऱ्यांना उत्त्पन्न कमी होते अशा अनेक समस्या ना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते याकरिता शासना वतीने शेतकऱ्यांना सन २०२२-२३ चेप्रधानमंत्री पीक विमा योजना चे रक्कम ८ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले त्या वेळी मनसैनिक रवि वल्लमवार,तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे विभाग अध्यक्ष अमर मेत्राम,व शेतकरी दत्ता लोणकर,गोवर्धन चौधरी,अशोक भट्ट,अजाब मडावी,भीमराव आत्राम,देवराव कुंभारे,सुरेश आत्राम,देविदास, सिडाम,वामन आत्राम,दत्ता बदकी,महादेव मत्ते,मनोहर कुंभारे,राजेश कुंभारे,प्रकाश आत्राम,सुरज भट,कान्हु लोणकर,नागसेन भगत,मनीष मते, मारुती ढेंगळे,संतोष भट,तुळशीराम पिपंळशेंडे,आप्पा बावणे आदी मनसैनिक शेतकरी उपस्थित होते,


