प्रमोद अहिनवे तालुका प्रतिनिधी, चिदंबर
सेवासमिती व देहु संस्थान आयोजित श्रीक्षेत्र देहु ते श्रीक्षेत्र ओतुर सदगुरु दिंडी सोहळा सोमवारी संपन्न झाला. श्रीक्षेत्र ओतुर येथे श्री संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी मंदिर आहे .दिंडी सोहळा बाबाजी चैतन्य महाराज मंदिराकडे पोहचताना ठिकठिकाणी स्वागत करण्यात आला व हरिनामाच्या गजरात श्री कपदि॔केश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजा व तुप पावशेर संकल्पनापुर्तता करण्यात आली.