संतोष भरणे ग्रामीण प्रतिनीधी इंदापूर
इंदापूर -विधिमंडळामध्ये विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंगळवारी मंजूर करण्यात आले आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी त्यांचा अहवाल 16 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारला सादर केला.राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल स्वीकारल्यानंतर आज विधिमंडळात मराठा आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे.न्या.सुनील शुक्रे यांच्या आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आल्याने,सदरचे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारे आहे.आजच्या आरक्षणाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला फायदा होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.