अविनाश पोहरे ब्युरो चिफ, अकोला
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ व्या जयंतीनिमित्त अक्षय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली “छत्रपती प्रबोधन वारी”. कल्याणकारी राज्य प्रस्थापित करायचे असेल तर छत्रपती आपल्याला समजून घ्यावे लागतील, म्हणून छत्रपती हे घराघरात, मनामनात पोहोचावे अशी ही संकल्पना आहे. ढाल तलवारी पलिकडील छत्रपतींनी रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण केलं. खऱ्या अर्थानं जर आज स्वराज्या सारखं सुराज्य निर्माण करायचं असेल तर महाराजांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आपल्याला जाणून घ्यावे लागतील या उद्देशाने सूरू झाली छत्रपती प्रबोधनवारी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त अक्षय राऊत यांनी १५ फेब्रुवारीला जळगाव पासून छत्रपती प्रबोधन वारीला सुरुवात झाली. ही प्रबोधन वारी म्हणजे शिवरायांचे कृषी धोरण, उद्योग व्यापार धोरण, स्त्रियांविषयी धोरण, त्यांची धर्मनिरपेक्षता, समुद्री आरमाराविषयी ची त्यांची दूरदृष्टी, प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार त्याची नेमणूक या अशा बहुआयामी शिवाजी महाराजांची ओळख छत्रपती प्रबोधन वारीच्या माध्यमातुन प्रत्येक व्यक्तीला करून द्यावी म्हणून केलेला प्रयत्न. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार – युद्ध – मराठा – स्वराज्य इथपर्यंत मर्यादित करून ठेवले आहेत पण या व्यतिरिक्त छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे निर्माण करावे याचा एक आदर्श नमुना इतिहासात आपल्यासाठी ठेवला आहे. त्या शिवाजी महाराजांचे विचार गावागावात ,मनामनात आणि प्रत्येकाच्या डोक्यात भिनले पाहिजे म्हणून ही वारी अक्षय राऊत यांनी सुरू केली. जवळपास तीस पेक्षा अधिक ठिकाणी अक्षय राऊत प्रबोधन करणार आहेत.१५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या प्रबोधन वारीची सांगता अंधार सांगवी या गावी 29 फेब्रुवारी रोजी होईल.अशी असेल छत्रपती प्रबोधनवारी जळगाव, पांगरी, जालना, रीठद, कारंजा, बहिरखेड, रहिमतखेड, मोझर,अकोला, रामतीर्थ, रायखेड, बार्शीटाकळी, डोंगरगाव, तरोडा, माहनोरा, मांडवा, वाशिम, गोडेगाव, जालना, शिर्ला, अकोला,पातुर,अंधार सांगवी. व मार्गावरील इतर ठिकाणी सुध्दा होईल.करीता संपर्क. ७२१९५८४६०४चौकट…छ.शिवाजी महाराजांची जयंती फक्त एका दिवसाची नसून आजच्या काळामध्ये आदर्श घ्यावा असा खरा विचार लोकांपर्यंत पोहचवून लोकांना जागृत करण्यासाठी ही छत्रपती प्रबोधन वारी सूरू करण्यात आली आहे. – युवा वक्ते,अक्षय राऊत