रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र शासनातर्फे तेल्हारा तालुका कृषी अधिकारी यांच्या निरीक्षणात खरीप हंगाम 2022 – 23 मधे तालुकास्तरीय पीक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पधेचा निकाल डिसेबर 2023 मधे लागला आहे. त्यामध्ये हिवरखेड येथील प्रगतिशील शेतकरी विरेंद्र रामकिसन गुप्ता माजी सभापती सेवा सहकारी सोसायटी हिवरखेड यांनी सोयाबिन हेक्टरी तीस किंटल उत्पादन घेऊन तेल्हारा तालुका मधुन व्दितीय क्रंमाक मिळविला आहे. त्यांना शासनाकडून 3000 रुपये पुरस्कार राशी मिळणार आहे. त्यांना मा. कृषी सहाय्यक पेठे, सदार मॅडम, राजनकार, महेश इंगळे इत्यादी कृषी सहाय्यकानी मार्गदर्शन केले आहे.


