राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी,अमरापूर
अमरापूर: दि.20संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला.प्रतिकात्मक गाडगेबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.प्रतिमपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या भजनाने वातावरण प्रसन्न झाले.अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना शिक्षणाचे,स्वच्छतेचे,अंधश्रद्धा यांची माहिती ज्येष्ठ शिक्षक एकनाथ जवरे यांनी दिली.यावेळी भिमराव भेरे भाऊ प्रमुख अतिथी म्हणू उपस्थित होते.काही मुलांनीही आपले विचार मांडले.नंदू खाडे यांनी मुलांची वेशभूषा करत सुंदर फ़लक लेखनही केले.सांस्कृतिक विभागाने चांगले नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.याप्रसंगी सर्व कर्मचारी उपस्थित होते.