उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: जगाच्या पाठीवर अनेक लोक असे आहेत की, देवाच्या श्रद्धेपोटी ते अनेक कष्ट भोगत देवापुढे नतमस्तक होत असतात. नर्मदा परिक्रमा ही देखील श्रद्धेचा भाग आहे. अनेक लोक ओंकारेश्वर या ठिकाणाहून नर्मदा परिक्रमेला सुरुवात करीत असतात सहसा नर्मदा परिक्रमा ही पाईच केली जाते.परंतु काही लोक हे खाजगी वाहने तसेच ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ही परिक्रमा पूर्ण करीत असतात. तर बरेच लोक असे आहेत की, जे पायीच ही परिक्रमा पूर्ण करण्यावर भर देत असतात. त्यातल्या त्यात ही परिक्रमा करणारे अनेक साधु,संत,महंत, यांच्यात अनेक विविधता पाहण्यास मिळतात हे लोक ओंकारेश्वर पासून पायी चालत असताना आपले वेगवेगळे मुक्कामाचे थांबे शोधत त्या ठिकाणी मुक्काम करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच पुढे मार्ग क्रमण करीत असतात.तळोदा तालुक्यातील आमलाड या गावी या लोकांना राहण्याची व्यवस्था गुजर समाजातील नागरिकांमार्फत सेवा म्हणून करण्यात येत असते. या ठिकाणी यांना सर्व काही दिले जाते. अन्नापासून ते पाण्याची व्यवस्था तसेच सर्व व्यवस्था या ठिकाणी मोफत करण्यात येत असते. काही लोक या ठिकाणी थांबतात तर काही लोक तळोद्यातील कनकेश्वर मंदिर या ठिकाणी मुक्काम करतात.अशांमध्ये मध्य प्रदेश या राज्यातील बडा आमगाव तालुका करेली जिल्हा नर्सिंगपूर येथील रहिवास असलेले कमलदासजी त्यागी हे गेल्या २३ वर्षांपासून माता नर्मदेची सेवा करत आहेत.ते भोपाळ तालुक्यातील दिना गावात अन्नपूर्णा आश्रम चालवितात. गेल्या २ वर्षांपासून ते नर्मदा परिक्रमा करीत आहेत.या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे कमलदासजी हे ओंकारेश्वर येथून दंडवत घालत ही परिक्रमा पूर्ण करत आहेत.त्यांच्याजवळ एक छोटी साधी लॉरी सारखी गाडी असून त्या गाडीवर आपला सामान ते ठेवतात त्यामध्ये आपले कपडे तसेच नित्योपयोगी समान,पिण्याचे पाणी व त्यांच्याकडे देवीचा एक फोटो आहे.ह्या गाडीला दोरी बांधण्यात आली असून ती गाडी ते हाताने पुढे ओढतात दुसऱ्या हातात एक नारळ व कपडा आहे.लोटांगण घालतांना ते हात लांब करून नारळ पुढे पुढे ठेवत चालतात.व कापड जमिनीवर ठेवल्यानंतर ते त्यावर आपले शरीर ठेवतात अशापद्धतीने ते दंडवत करत पुढे सरकत आहेत. वास्तविक ही बाब खूप कष्टमय आहे तरीही आस्थेला कष्टाची जोड देत हे बाबा पुढे सरकत आहेत. ६ महिन्यात ही यात्रा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.अशा परिस्थितीत त्यांना कोणीही सहज मदत करत असतात.
“त्यात तळोदा तालुक्यातील शिक्षक योगेश चव्हाण हे गेल्या ३ वर्षांपासून आमलाड ते आश्रवा गावापर्यंत येणाऱ्या परिक्रमा वासीयांना चहा ,बिस्कीट, नाश्ता,जेवण हे पुरवीत असतात बऱ्याच वेळा ते स्वतः घरून बनवून आणत असतात. व परिक्रमा वासीयांना देत असतात याकामी त्यांना विलास गुरव,जालंदर भोई,तसेच गावातील सेवाभावी लोकं आर्थिक तसेच साहित्यरूपी मदत करत असतात.तसेच त्यांच्या या सेवेला डॉ.संदीप जैन,डॉ.सुनील लोखंडे,डॉ.महेश मोरे, डॉ.बडगुजर यांच्या वैद्यकीय सेवेची जोड मिळते.कोणाला गरज असल्यास वरील डॉ.हे सेवा मोफत सेवा पुरवीत असतात.”


